Ladki bahin Yojana New GR Today : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते न मिळालेल्या लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून आज नवीन शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला असून तब्बल 730 कोटी रुपयांचा निधी वितरणासाठी मंजूर करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात दोन्ही महिन्यांचे पैसे जमा झाले नव्हते. काही महिलांना 3000 रुपये मिळाले, तर काही महिलांच्या खात्यात अजूनही एकही रुपया जमा झाला नव्हता. त्यामुळे “आपला हप्ता बंद झाला का?”, “आपण अपात्र ठरलो का?” अशा चर्चा गावागावात सुरू होत्या.याच पार्श्वभूमीवर आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
सामाजिक न्याय विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार मार्च 2026 साठी 365.2550 कोटी रुपये आणि एप्रिल 2026 साठी 365.2550 कोटी रुपये असा एकूण 730.5100 कोटी रुपयांचा निधी महिला लाभार्थ्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे.हा निधी महिला व बाल विकास विभागाला वितरित करण्यास अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसे आले नाहीत, त्यांना आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे अनेक महिलांनी e-KYC पूर्ण असूनही पैसे न मिळाल्याची तक्रार केली होती. काही महिलांना Application Pending, Under Review किंवा Verification सुरू असल्याचे स्टेटस दिसत होते. त्यामुळे अनेक लाभार्थी महिला संभ्रमात होत्या.आता नवीन GR आल्यानंतर पुढील काही दिवसांत रखडलेले हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः ज्या महिलांना मार्च आणि एप्रिल दोन्ही महिन्यांचे पैसे मिळाले नाहीत त्यांनी आता आपला अर्ज स्टेटस आणि बँक खाते तपासून ठेवणे आवश्यक आहे.
राज्यातील अनेक महिलांसाठी ही योजना केवळ आर्थिक मदत नसून घरखर्चाचा मोठा आधार बनली आहे. किराणा, मुलांचे शिक्षण, औषध खर्च आणि दैनंदिन गरजांसाठी अनेक महिला या 1500 रुपयांच्या हप्त्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे पैसे रखडल्याने अनेक कुटुंबांमध्ये चिंता निर्माण झाली होती.आता सरकारने निधी मंजूर केल्यामुळे लाखो महिलांच्या अपेक्षा पुन्हा वाढल्या आहेत.
पुढील काही दिवसांत खात्यात पैसे जमा होतात का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे
हेही वाचा: Ladki Bahin Yojana Takrar 2026: पैसे आले नाहीत अशी करा तक्रार नवीन सुविधा सुरू Latest Update


