मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाखो पात्र महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मे 2026 च्या हप्त्याच्या वितरणासाठी शासनाने निधी मंजूर केला असून आता पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात लवकरच अनुदान जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 10 ते 15 तारखेच्या दरम्यान हप्ता वितरित करण्याचे नियोजन शासनाने केले होते. त्यानुसार आता मे महिन्याच्या थकीत हप्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील पात्र लाभार्थी महिलांसाठी सुमारे ₹344.74 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी इतर प्रवर्गांसाठी निधी वितरित करण्यात आला होता. त्यामुळे आता मे महिन्याचा हप्ता प्रत्यक्ष खात्यात जमा होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे.
काही महिलांना एकाच वेळी मिळू शकतात 3 ते 4 हप्ते
लाडकी बहीण योजनेच्या पडताळणी प्रक्रियेमुळे अनेक महिलांचे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे हप्ते प्रलंबित राहिले होते. काही महिलांना मार्च आणि एप्रिलचे पैसे मिळाले असले तरी मे महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. तर काही पात्र महिलांना फेब्रुवारीपासूनचे हप्तेच मिळालेले नाहीत.
अशा परिस्थितीत ज्या महिलांची पडताळणी पूर्ण झाली आहे आणि ज्या पात्र ठरल्या आहेत, त्यांच्या खात्यात प्रलंबित हप्त्यांची रक्कम एकत्र जमा होऊ शकते. त्यामुळे काही महिलांना ₹3,000, ₹4,500 किंवा अगदी ₹6,000 पर्यंतची रक्कम खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पात्र महिलांनी काय करावे?
ज्या महिलांना अद्याप हप्ता मिळालेला नाही त्यांनी आपले बँक खाते, आधार लिंकिंग आणि e-KYC स्थिती तपासून घ्यावी. पडताळणी पूर्ण झालेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने निधी जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थींनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत अपडेटकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
राज्यातील लाखो महिलांचे लक्ष आता मे महिन्याच्या हप्त्याकडे लागले असून पुढील काही दिवसांत खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होऊ शकते.
हेही वाचा: Ladki Bahin Yojana Takrar 2026: पैसे आले नाहीत अशी करा तक्रार नवीन सुविधा सुरू Latest Update
Comment करा
💬 तुमच्या खात्यात मार्च, एप्रिल किंवा मे महिन्याचा हप्ता जमा झाला आहे का?
तुम्हाला किती महिन्यांचे पैसे मिळायचे बाकी आहेत? तुमचा जिल्हा खाली Comment मध्ये नक्की सांगा. 🌸👇



December pasun nahi aale
Ekyc करा किंवा तक्रार नोंदवा….