Karjmafi NPA, OTS Haircut Rule: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी सन्मान योजनेची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर हजारो शेतकऱ्यांमध्ये एकच प्रश्न निर्माण झाला आहे – “माझं कर्ज 2 लाख होतं, पण कर्जमाफीच्या यादीत फक्त ₹60 हजार, ₹80 हजार किंवा ₹1.20 लाखच का दिसत आहे?”
अनेक ठिकाणी Karj Mafi NPA, OTS Haircut Rule सल्याची चर्चा सुरू आहे. काही शेतकरी आंदोलनाची तयारी करत आहेत, तर काहींना बँकेने चुकीची माहिती दिली असे वाटत आहे.
पण प्रत्यक्षात प्रत्येक ठिकाणी ही चूक असेलच असे नाही. काही प्रकरणांमध्ये NPA, OTS (One Time Settlement) आणि Haircut नियमामुळे कर्जमाफीची रक्कम वेगळी दिसू शकते.
हा नियम अनेक शेतकऱ्यांना अजूनही समजलेला नाही. त्यामुळे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया.
NPA म्हणजे काय?
सोप्या भाषेत सांगायचं झालं तर…
तुम्ही बँकेतून पीक कर्ज किंवा शेतीसाठी कर्ज घेतलं.
बराच काळ हप्ते भरले नाहीत.
कर्जाची मुदत संपली तरी पैसे भरले नाहीत.
मग बँक त्या खात्याला NPA (Non-Performing Asset) म्हणजेच थकीत कर्ज खाते म्हणून घोषित करते.
याचा अर्थ कर्ज माफ झालं असा नाही.
फक्त ते खाते नियमित राहत नाही.
OTS म्हणजे काय?
OTS (One Time Settlement) म्हणजे…
बँक आणि कर्जदार यांच्यातील एकदाच होणारा तडजोडीचा करार.
म्हणजे…
समजा एखाद्या शेतकऱ्याचं थकीत कर्ज ₹2 लाख आहे.
तर काही परिस्थितीत संपूर्ण ₹2 लाख न भरता शासनाने ठरवलेल्या नियमांनुसार कमी रक्कम भरून ते खाते पूर्णपणे बंद (Nil) करता येते.
यालाच OTS म्हणतात.
Haircut म्हणजे काय?
Haircut हा शब्द ऐकून अनेकांना वाटतं केस कापण्याशी संबंध आहे.
पण बँकिंगमध्ये Haircut चा अर्थ वेगळा आहे.
याचा अर्थ…
बँक काही रक्कम माफ करून उरलेली रक्कम स्वीकारते आणि खाते पूर्णपणे निकाली काढते.
म्हणजे…
शेतकऱ्याला पुन्हा नवीन कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होतो.
मग कर्जमाफीची रक्कम कमी का दिसते?
हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे.
समजा…
एखाद्या शेतकऱ्याचं थकीत कर्ज ₹2,00,000 आहे.
पण ते खाते NPA आहे.
आणि त्या खात्यावर OTS लागू झाला.
तर शासन संपूर्ण ₹2 लाख बँकेत भरत नाही.
OTS नियमांनुसार जितकी रक्कम भरल्यावर खाते पूर्णपणे Nil होणार आहे तितकीच रक्कम शासन भरते.
त्यामुळे यादीमध्ये ₹2 लाखाऐवजी ₹70 हजार, ₹90 हजार किंवा ₹1.20 लाख अशी रक्कम दिसू शकते.
याचा अर्थ शेतकऱ्याचं नुकसान झालं असंच असेल, असं नाही.
जर त्या रकमेमुळे बँकेकडील संपूर्ण खाते निकाली निघत असेल, तर OTS नियमानुसार ते वैध असू शकते.
Haircut योजनेचे टप्पे
सहकार विभागाने दिलेल्या माहितीनुसार…
✅ 30 सप्टेंबर 2021 किंवा त्यापूर्वीचे NPA कर्ज
➡️ एकूण थकीत कर्जाच्या 35% रक्कम भरून खाते निकाली काढता येऊ शकते.
✅ 1 ऑक्टोबर 2021 ते 30 सप्टेंबर 2022
➡️ 45% रक्कम भरून खाते Nil होऊ शकते.
✅ 1 ऑक्टोबर 2022 ते 30 सप्टेंबर 2023
➡️ 55% रक्कम भरावी लागू शकते.
✅ 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024
➡️ 70% रक्कम भरून खाते बंद होऊ शकते.
✅ 1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025
➡️ 85% रक्कम भरून खाते निकाली काढता येऊ शकते.
एक सोपं उदाहरण Karjmafi NPA, OTS Haircut Rule
समजा…
तुमचं थकीत कर्ज ₹1,00,000 आहे.
आणि तुमचं खाते अशा कालावधीतील आहे ज्यासाठी 35% OTS लागू आहे.
तर…
शासन बँकेत सुमारे ₹35,000 भरते.
बँक उर्वरित रकमेवर Haircut करून खाते पूर्णपणे Nil करते.
म्हणून कर्जमाफीच्या यादीत ₹35,000 दिसले तरी…
तुमचं संपूर्ण NPA खाते बंद होऊ शकतं.
म्हणून यादीतील रक्कम आणि मूळ कर्जाची रक्कम नेहमी सारखी असेलच असे नाही.
मग प्रत्येक Karjmafi NPA, OTS Haircut Rule हे OTS मुळेच असते का?
नाही.
सर्वच प्रकरणांमध्ये Haircut किंवा OTS लागू असेलच असे नाही.
Karj Mafi Amount Mismatch रक्कम कमी दिसण्यामागे इतर कारणेही असू शकतात.
उदाहरणार्थ…
- फक्त पात्र पीक कर्जाचा समावेश
- आधीच भरलेली काही रक्कम
- व्याजाची वेगळी गणना
- बँकेची पडताळणी
- पात्रतेचे नियम
म्हणून आपल्या प्रकरणाची माहिती संबंधित बँक किंवा अधिकृत कार्यालयातून तपासून घ्यावी.
31 मार्च 2026 पर्यंतच्या थकबाकीबाबत काय?
सहकार विभागाच्या माहितीनुसार, 31 मार्च 2026 पर्यंतची थकीत रक्कम पोर्टलवर विचारात घेण्यात आली आहे. त्यानंतरच्या व्याजाबाबत संबंधित बँकांची जबाबदारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अचूक लाभ प्रत्येक प्रकरणातील पात्रता आणि अंमलबजावणीच्या नियमांनुसार ठरेल.
हे देखील वाचा
👉 कर्जमाफीसाठी KYC कशी करावी? येथे क्लिक करा
👉कर्जमाफी यादीत नाव असूनही त्रुटी दिसत असल्यास काय करावे? येथे क्लिक करा
👉 कर्जमाफी लाभार्थी यादीत नाव कसे तपासायचे? येथे क्लिक करा
👉 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 – संपूर्ण माहिती येथे क्लिक करा
निष्कर्ष
कर्जमाफी कमी दिसत असल्यामुळे लगेच बँकेने किंवा शासनाने चूक केली आहे असा निष्कर्ष काढू नका.
जर तुमचं खाते NPA असेल आणि त्यावर OTS (One Time Settlement) व Haircut नियम लागू होत असतील, तर यादीत दिसणारी रक्कम मूळ कर्जापेक्षा कमी असू शकते.
तथापि, Karjmafi NPA, OTS Haircut Rule प्रत्येक प्रकरण वेगळे असते. त्यामुळे आपल्या खात्याची स्थिती, OTS लागू आहे का, आणि कोणत्या आधारावर रक्कम निश्चित झाली आहे याची माहिती संबंधित बँकेत किंवा अधिकृत कार्यालयात जाऊन तपासून घ्या.


