मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या प्रलंबित ₹1500 हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जुलैचा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ₹319 कोटी 53 लाखांचा निधी जुलै 2026 च्या हप्त्याच्या वितरणासाठी उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ही रक्कम एकूण ₹3,000 कोटींच्या तरतुदीचा भाग असल्याचे सांगितले जात आहे.
मग महिलांच्या खात्यात पैसे कधी येणार?
या निधीनंतर अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठीही निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात DBTद्वारे ₹1500 हप्ता जमा केला जाऊ शकतो.
उपलब्ध माहितीनुसार 15 ऑगस्टपूर्वी हप्ता वितरित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र प्रत्येक महिलेच्या खात्यात पैसे एकाच दिवशी जमा होतीलच असे नाही.
₹3000 मिळणार का?
जुलैचा हप्ता उशिरा झाल्यास जुलै आणि ऑगस्टचे मिळून ₹3000 देण्याची चर्चा यापूर्वी झाली आहे. मात्र ₹3000 एकत्र जमा करण्याची अधिकृत घोषणा झाल्याशिवाय हा दावा निश्चित मानू नका.
हे देखील वाचा:
Ladki Bahin Yojana Takrar 2026: पैसे आले नाहीत अशी करा तक्रार नवीन सुविधा सुरू Latest Update
थोडक्यात: जुलैच्या ₹1500 हप्त्यासाठी निधी उपलब्ध करण्याची प्रक्रिया पुढे सरकत असल्याने लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला आहे. आता अंतिम DBT तारीख आणि पुढील अधिकृत शासन निर्णयाकडे लक्ष आहे.
offical link : Ladki Bahin Yojan


