नागपूर कर्जमाफी 2026: राज्यात शेतकरी कर्जमाफीबाबत हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. शेतकऱ्यांनी आपली माहिती बँकेत सादर करावी, असे आवाहन करणारी जाहिरात काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर या प्रक्रियेला गती मिळाल्याचे दिसून येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून थकीत शेतकरी कर्जाची माहिती गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बँकेच्या सर्व शाखांना कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कागदपत्रे संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
संकलित माहिती सहकार विभागाकडे सादर केली जाणार असून त्यानंतर पुढील निर्णय प्रक्रियेसाठी ती वापरली जाऊ शकते. शासनाने यापूर्वी 30 जूनपर्यंत कर्जमाफी धोरण जाहीर करण्याचा उल्लेख केल्याने या हालचालींकडे विशेष लक्ष लागले आहे.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांची माहिती अपूर्ण आहे किंवा नोंदी अद्ययावत नाहीत त्यांनी संबंधित बँक शाखेशी संपर्क साधून तपशील सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या कर्जमाफीबाबत अधिकृत घोषणा झालेली नसून अंतिम निर्णय शासनाच्या आदेशानंतरच स्पष्ट होणार आहे.
अशाच सरकारी योजनांच्या अपडेट्ससाठी आमच्या whatsapp Group नक्की जॉईन करा!
Tags: #कर्जमाफी #KarjMafi #FarmerNews #MaharashtraNews #GovernmentUpdate #SchemeUpdate #MarathiNews



Karj maphe zale ka sagne lam poor farmar from jintoor
Hsh
Bdbdhdhdhdjdh
Sopan padole
shetkari karjmafi list 2026 is not available online . plz make it public online .