Karj Mafi ekyc Maharashtra 2026 शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन : आधार पडताळणी (e-KYC) अनिवार्य

Karj Mafi 2026 संदर्भात मोठी अपडेट! जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. Karjmafi SMS, आधार पडताळणी (e-KYC), OTS योजना, लाभार्थी यादी आणि बँकेची पुढील प्रक्रिया याबाबतची महत्त्वाची माहिती येथे जाणून घ्या.

Karj Mafi ekyc Maharashtra 2026 शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन आधार पडताळणी (e-KYC) अनिवार्य

Karj Mafi ekyc Maharashtra 2026 योजनेचा लाभ मिळवण्यासाठी केवळ पात्र यादीत नाव असणे पुरेसे नाही. शासनाने संपूर्ण प्रक्रिया आधार क्रमांकावर आधारित आणि पूर्णपणे डिजिटल केली आहे. त्यामुळे अंतिम लाभ मिळण्यापूर्वी प्रत्येक पात्र शेतकऱ्याने आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणी (e-KYC) पूर्ण करणे अनिवार्य आहे.

ज्या शेतकऱ्यांचे नाव लाभार्थी यादीत असेल त्यांनी आधार कार्ड किंवा लाभार्थी क्रमांकासह जवळच्या “आपले सरकार सेवा केंद्र” किंवा संबंधित बँक शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांची माहिती अंतिम केली जाईल आणि त्यानंतरच कर्जमाफीची रक्कम थेट संबंधित कर्जखात्यात जमा केली जाईल.

ज्या शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकीत पीक कर्ज आहे आणि जे One Time Settlement (OTS) योजनेसाठी पात्र आहेत, त्यांनी प्रथम शासन निर्णयानुसार त्यांच्या वाट्याची अतिरिक्त रक्कम बँकेत जमा करणे आवश्यक आहे. त्यानंतरच शासनाकडून मंजूर होणारी कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कर्जखात्यात जमा केली जाईल. त्यामुळे OTS लाभार्थ्यांनी वेळ न दवडता आपल्या बँक शाखेशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.

शासनाने पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी गाव चावडी, ग्रामपंचायत, बँक शाखा, विकास संस्था आणि आपले सरकार सेवा केंद्र येथे उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे. तसेच पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर बँकेमार्फत SMS (Karjmafi Message) पाठवून पुढील प्रक्रियेबाबत माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक, आधार माहिती आणि बँक खाते तपशील अद्ययावत ठेवावेत.

हेही वाचा: Karj Mafi Maharashtra 2026 : List PDF Download, District Wise यादी, GR, Cut Off Date आणि नवीन नियम सविस्तर Latest updated

अशाच सरकारी योजनांच्या अपडेट्ससाठी आमच्या whatsapp Group नक्की जॉईन करा!

💬 महत्त्वाची सूचना

तुमच्या मोबाईलवर कर्जमाफीचा SMS आला आहे का?
खाली तुमचा जिल्हा, बँकेचे नाव आणि “SMS आला / आला नाही” असे Comment करून इतर शेतकरी बांधवांनाही माहिती द्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top