Ladki Bahin Yojana Status Check Online 2026
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात प्रत्येकी 1500 रुपयांप्रमाणे एकूण 3000 रुपये जमा झाले आहेत. मात्र, अजूनही काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.
यामुळे “आपला हप्ता बंद झाला आहे का?” असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आता महिलांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने अर्जाची स्थिती तपासता येणार आहे.
मार्च आणि एप्रिलचे हप्ते एकत्र का आले?
मार्च महिन्याचा हप्ता काही तांत्रिक कारणांमुळे रखडला होता. त्यामुळे सरकारने आता मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र जमा करण्यास सुरुवात केली आहे.
अनेक महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले असले तरी काही लाभार्थींना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. यामागे विविध कारणे असू शकतात.
पैसे न येण्यामागची प्रमुख कारणे
लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने काही पात्रता निकष निश्चित केले आहेत. खालील कारणांमुळे तुमचा हप्ता थांबू शकतो:
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असणे
- एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त महिलांनी अर्ज करणे
- e-KYC अपूर्ण असणे
- आधार कार्ड आणि बँक खाते लिंक नसणे
- अर्जातील माहिती चुकीची असणे
- कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत असणे
अशा प्रकारे चेक करा स्टेटस
Ladki Bahin Yojana Status Check Online Step By Step
Step 1
सर्वात आधी अधिकृत वेबसाइटladakibahin.maharashtra.gov.in
या पोर्टलवर जा.
Step 2
यानंतर “अर्जदार लॉग इन” या पर्यायावर क्लिक करा.
Step 3
तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका.
जर पासवर्ड विसरला असेल तर तो पुन्हा Generate करता येतो.
Step 4
लॉगिन झाल्यानंतर “लाभार्थी यादी” किंवा “अर्जाची स्थिती” या पर्यायावर क्लिक करा.
Step 5
यानंतर तुमचा आधार नंबर आणि अर्ज क्रमांक टाका.
Step 6
आता स्क्रीनवर तुमच्या अर्जाची संपूर्ण माहिती दिसेल.
तुम्हाला हप्ता मिळणार आहे की नाही, अर्ज मंजूर आहे का, Pending आहे का किंवा Rejected आहे का हे येथे तपासता येईल.
हप्ता आला नाही तर काय करावे?
जर तुमच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नसतील तर:
- e-KYC पूर्ण आहे का ते तपासा
- आधार आणि बँक खाते लिंक आहे का ते पहा
- अर्जातील माहिती Verify करा
- जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात संपर्क करा
लाडकी बहीण योजना तक्रार कशी करावी?
जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील, अर्ज अपात्र दाखवत असेल किंवा ई-केवायसीमुळे अडचण येत असेल तर तुम्ही जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन तक्रार करू शकता.
👉 हे देखील वाचा: ladki bahin yojana तक्रार form आणि अर्ज प्रक्रिया
सरकारने दिली ऑफलाईन तक्रारीची सुविधा
Ladki Bahin Yojana Status Check Online अनेक महिलांना ऑनलाइन प्रक्रियेत अडचणी येत असल्यामुळे आता सरकारने ऑफलाईन तक्रार करण्याचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महिलांना जिल्हा महिला विकास विभागात प्रत्यक्ष जाऊन कागदपत्रे सादर करता येणार आहेत.
अशाच सरकारी योजनांच्या अपडेट्ससाठी आमच्या whatsapp Group नक्की जॉईन करा!
निष्कर्ष
लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये खात्यात जमा झाले नसतील तर घाबरण्याची गरज नाही. सरकारने ऑनलाइन स्टेटस चेक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. Ladki Bahin Yojana Status Check Online त्यामुळे महिलांनी अर्जाची स्थिती तपासून आवश्यक कागदपत्रे वेळेत पूर्ण करावीत.


