जानेवारी हफ्ता:राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. राज्य शासनाने 18 फेब्रुवारी 2026 रोजी जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी निधी मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय (GR) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जारी करण्यात आला आहे.
योजनेसाठी एकूण सुमारे 3960 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यातून जानेवारी 2026 महिन्याचा लाभ देण्यासाठी 98 कोटी 45 लाख रुपयांच्या निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे.
थकीत हप्त्यांबाबत काय?
e-KYC प्रक्रियेमधील त्रुटींमुळे नोव्हेंबरपासून काही पात्र महिलांचे हप्ते थांबले होते. पडताळणी पूर्ण झालेल्या अशा लाभार्थ्यांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे थकीत मानधन पुढील हप्त्यासोबत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हप्ता कधी मिळू शकतो?
निधी मंजुरीनंतर लाभार्थ्यांच्या खात्यात DBT पद्धतीने रक्कम जमा केली जाते. त्यामुळे पडताळणी पूर्ण झाल्यानंतर लवकरच हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. अंतिम तारीख अधिकृतरीत्या जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईल.
कोणाला लाभ मिळेल?
पात्र महिला लाभार्थी
e-KYC पूर्ण झालेले अर्जदार
आधार-बँक खाते लिंक असलेले लाभार्थी
पडताळणी अपूर्ण राहिल्यास रक्कम जमा होण्यात विलंब होऊ शकतो.
सूचना: आम्ही कोणतीही शासकीय वेबसाईट नाही. अंतिम माहिती संबंधित विभागाच्या अधिकृत घोषणेनंतरच निश्चित होईल.
Tags : #लाडकीबहीणयोजना #LadkiBahinYojana #PaymentUpdate #GovernmentScheme #MaharashtraNews #DBTPayment #SchemeUpdate #MarathiNews
