Karjmafi 2026 Ahmednagar: अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 2 लाख 17 हजार खातेदारांची तपासणी पूर्ण झाली असून, त्यापैकी 1 लाख 92 हजार 594 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकरी आता कर्जमाफीच्या पुढील प्रक्रियेची वाट पाहत आहेत.
जिल्हा बँकेकडील माहितीनुसार, पात्र शेतकऱ्यांना ₹2 लाखांपर्यंतच्या पीक कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. मात्र शासनाच्या निकषांनुसार आयकर भरणारे, शासकीय कर्मचारी आणि काही राजकीय पदाधिकारी या योजनेच्या लाभातून वगळले जाणार आहेत. त्यामुळे अंतिम लाभार्थी यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ₹50 हजारांचे अनुदान
ज्या शेतकऱ्यांनी वेळेत पीक कर्जाची परतफेड केली आहे, त्यांच्यासाठीही आनंदाची बातमी आहे. अशा पात्र शेतकऱ्यांना ₹50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान दुसऱ्या टप्प्यात दिले जाणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, या अनुदानाचे वितरण 27 जुलैनंतर सुरू होण्याची शक्यता आहे.
ही आकडेवारी केवळ अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खातेदारांची आहे. राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांमधील पात्र शेतकऱ्यांची संख्या यापेक्षा वेगळी असून त्यांची प्रक्रिया स्वतंत्रपणे सुरू आहे.
विक्रमी वेगाने पूर्ण झाली तपासणी
अहिल्यानगर जिल्हा बँकेसमोर 2.17 लाख खात्यांची पडताळणी करण्याचे मोठे आव्हान होते. सुरुवातीला बँकेकडे केवळ 64 अधिकारी आणि कर्मचारी होते. मात्र काम जलद पूर्ण करण्यासाठी सहकार विभागाने धुळे, नंदुरबार, नाशिक, मुंबई आणि ठाणे येथून अतिरिक्त 93 अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून दिले. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांची तपासणी आणि माहिती अपलोड करण्याचे काम वेगाने पूर्ण झाले.
आता जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे लक्ष अंतिम लाभार्थी यादी, बँकेकडून येणारा Karjmafi SMS आणि कर्जमाफीची रक्कम कर्जखात्यात जमा होण्याकडे लागले आहे.
अशाच सरकारी योजनांच्या अपडेट्ससाठी आमच्या whatsapp Group नक्की जॉईन करा!
💬 Comment करा
तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील शेतकरी आहात?
तुमच्या बँकेकडून कर्जमाफीबाबत SMS आला आहे का? खाली तुमचा तालुका आणि बँकेचे नाव Comment मध्ये नक्की लिहा.



Cockage peer mohalla cage tiffin service ke liye loan ki jarurat hai