अजूनही राज्यातील अनेक शेतकऱ्यांना “फडणवीस सरकारने कर्जमाफी केली खरी, पण नेमकी कोणाची केली?” हा मोठा प्रश्न पडला आहे. एकीकडे विरोधी पक्ष कर्जमाफी GR ची होळी करत आंदोलन करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे लाखो शेतकरी अजूनही अधिकृत अंमलबजावणी आणि आपल्या नावाची खात्री होण्याची वाट पाहत आहेत.
सोशल मीडियावर आणि गावागावात कर्जमाफीबाबत अनेक अफवा पसरत आहेत. काही जण म्हणत आहेत सर्वांचे कर्ज माफ होणार, तर काही जण म्हणत आहेत लाखो शेतकरी या योजनेतून बाहेर राहणार. त्यामुळे सामान्य शेतकरी अधिकच संभ्रमात पडला आहे.
म्हणूनच कर्जमाफी 2026 चा GR नेमकं काय सांगतो, कोणाला 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार, कोणाला आधी पैसे भरावे लागणार आणि OTS नियम काय आहे, याची माहिती आम्ही येथे अगदी सोप्या उदाहरणासह देत आहोत. जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कुणी शेतकरी असाल, तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या कर्जमाफी 2026 बाबत माहिती शोधत आहेत. राज्य सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ मंजूर केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना वाटत आहे की त्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणार आहे. मात्र शासन निर्णय (GR) मध्ये एक महत्त्वाची अट देण्यात आली आहे, जी प्रत्येक शेतकऱ्याने समजून घेणे आवश्यक आहे.
विशेषतः ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांनी ही माहिती काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. कारण अशा शेतकऱ्यांना थेट कर्जमाफी मिळणार नाही. त्यासाठी शासनाने OTS (One Time Settlement) म्हणजेच एकवेळ समझोता योजनेचा नियम लागू केला आहे.
2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असेल तर काय करावे लागणार?
GR नुसार जर एखाद्या शेतकऱ्याची 30 सप्टेंबर 2025 रोजीची एकूण थकबाकी (मुद्दल + व्याज) 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्या शेतकऱ्याने प्रथम 2 लाखांवरील अतिरिक्त रक्कम बँकेत जमा करणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्याला 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो.
उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्याचे एकूण कर्ज ₹2.75 लाख असेल, तर त्याने प्रथम ₹75 हजार बँकेत भरावे लागतील. त्यानंतर उर्वरित ₹2 लाखांपर्यंतची रक्कम कर्जमाफी योजनेअंतर्गत विचारात घेतली जाईल.
याच कारणामुळे अनेक शेतकरी सध्या गोंधळलेले आहेत. कारण सरकारने 2 लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात काही शेतकऱ्यांना आधी स्वतःच्या खिशातून पैसे भरावे लागणार आहेत.
पूर्वी कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी वेगळा नियम
ज्या शेतकऱ्यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ घेतला होता, त्यांच्यासाठी GR मध्ये वेगळा नियम देण्यात आला आहे.
अशा शेतकऱ्यांची थकीत रक्कम ₹50 हजारांपेक्षा जास्त असल्यास प्रथम ₹50 हजारांवरील संपूर्ण रक्कम बँकेत जमा करावी लागेल. त्यानंतरच त्यांना ₹50 हजारांपर्यंतचा OTS लाभ दिला जाणार आहे.
विशेष म्हणजे शासनाने ही अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांनी आता काय करावे?
सध्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बँकेतील कर्ज खात्याची माहिती तपासून घ्यावी. तुमची एकूण थकबाकी किती आहे, त्यातील किती रक्कम कर्जमाफीसाठी पात्र ठरू शकते आणि OTS अंतर्गत तुम्हाला किती रक्कम स्वतः भरावी लागेल याची माहिती बँकेतून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कारण Karj Mafi Maharashtra 2026 ही सरसकट कर्जमाफी नसून काही ठराविक नियम आणि अटींवर आधारित योजना आहे. त्यामुळे GR मधील प्रत्येक नियम समजून घेतल्यास पुढील काळात होणारा गोंधळ टाळता येऊ शकतो.
Comment 👇
तुमच्या कर्ज खात्यावर किती थकबाकी आहे?
तुमचे कर्ज ₹2 लाखांपेक्षा जास्त आहे का? हा OTS नियम तुम्हाला योग्य वाटतो का? खाली Comment मध्ये तुमचे मत नक्की सांगा. 🌾💬


